मुंबईची जीवनवाहिनी होणार १५ डब्यांची !

वृत्तसंस्था

मुंबई, २९ नोव्हेंबर

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या डब्यांची संख्या १५ करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. काल एक बैठकीत रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत माहिती दिली.

स्रोत: Local Press Co.

मुंबई आणि ‘मुंबईची लोकल’ हा संपूर्ण देशभर आकर्षणाचा आणि चर्चेत राहणारा विषय आहे. मुंबईची लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. मात्र उपनगरात प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या आणि त्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास हाही तितकाच गंभीर्याचा मुद्दा आहे. या समस्येवर थोडा का होईना, मात्र तोडगा काढण्याचा निर्णय केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. सर्व उपनगरीय लोकल आता १५ डब्यांच्या होणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी काल केली. याबाबतच्या जाहीर सूचना गोयल यांनी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत गोयक यांनी मुंबई लोकलमध्ये करण्यात येणाऱ्या बदलांची माहिती दिली. मुख्यत्वाने १२ डब्यांची असलेली लोकल १५ डब्यांची करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असल्याचे गोयल यांनी सांगितले. याविषयी लवकरात लवकर योग्य तो आराखडा तयार करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

लोकलमध्ये करण्यात आलेल्या या बदलणे गर्दी कमी होईल असे तर म्हणता येणार नाही, मात्र ट्रेनमध्ये चढताना होणारी चेंगराचेंगरी, धक्काबुक्की, वाद-विवाद आणि अपघात अशा वाईट प्रसंगातून अल्पशी सुटका होण्यास प्रवाशांना मदत होईल.  अल्पशी सूटका हो

‘लोकलचे डब्यांमध्ये वाढ केल्याने मुंबई रेल्वेची कार्यक्षमता २५ टक्क्यांनी सुधारू शकते. सर्वप्रथम मध्य आणि पश्मिच रेल्वेच्या जलद मार्गांवर १५ डब्यांच्या लोकल धावतील. त्यानंतर धीम्या मार्गावरही १५ डब्यांची लोकल सुरू करण्याचा प्रयत्न आहे’ असे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.

● उपनगरीय रेल्वेची वर्तमान स्थिती 

पश्चिम रेल्वेअंतर्गत धावणाऱ्या १२ डब्यांच्या रेल्वेगाडीची क्षमता एका फेरीत तीन हजार प्रवासी वाहून नेण्याची आहे. मात्र प्रवाशांची संख्या आणि गर्दी बघता (गर्दीच्यावेळी) याच लोकलमधून ५,५०० पेक्षा अधिक लोक प्रवास करत असतात. सोबतच १५ डब्यांच्या गाड्यांची प्रवासी वहनक्षमता ४, २०० इतकी आहे. मात्र गर्दीच्यावेळी या गाड्यांमधून सुमारे ७,००० प्रवासी प्रवास करतात. म्हणजेच, गर्दीच्यावेळी डब्याच्या प्रति चौरस मीटर जागेतून तब्बल १६ प्रवासी प्रवास करत असल्याचे, रेल्वेच्याया पाहणीतून उघडकीस आले आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: