नवे शिक्षण धोरण येणाऱ्या पिढीसाठी क्रांतिकारी फायद्याचे ठरेल

“‘गावची शाळा, आमची शाळा’ संकल्पना राबवताना शाळेचा दर्जा सुधारण्यात मदत तर झाली, पण शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे यासाठी नवे शिक्षण धोरण असले पाहिजे, असे माझे मत होते. आता नव्या शिक्षण धोरणाने विद्यार्थ्यांवर पडणारा शैक्षणिक ताण कमी होणार असून, त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेणे सोपे होणार आहे.”

ब्रेनविशेष | नवे शिक्षण धोरण

कोणत्याही देशात एखादा मोठा बदल करावयाचा असेल, तर सर्वप्रथम तेथील शिक्षण पद्धती बदलली पाहिजे. इंग्रजांनी देशात येताच सर्वप्रथम भारतीय शिक्षण पद्धतीवर आघात केला. तसेच भारतीय प्राचीन शिक्षण पद्धत बदलून स्वतःची शिक्षण पद्धत सुरू केली, कारण त्यांना देशावर राज्य करायचे होते, त्यांना इंग्रजी व्यवस्था चालवणारे माणसं घडवायचे होते. मात्र लोकमान्य टिळकांनी इंग्रजांचा हा बेत लगेच ओळखला आणि स्वतःच्या शाळा सुरू केल्या. कारण इंग्रजी शिक्षण प्रणाली ही इंग्रजांना फायदेशीर होती. यात महात्मा फुले दाम्पत्यानी मोलाची भूमिका बजावली. स्वतःच्या शाळा काढून त्यांना राष्ट्रीय शिक्षण देणे आणि त्यांच्या शिक्षणाचा फायदा देशाला करून घेणे, तसेच देशकार्यासाठी झटणारी पिढी निर्माण करणे हा त्यांचा यामागचा मूळ उद्देश होता.

खेर देश स्वतंत्र झाला, मात्र शिक्षण पद्धत काही बदलली नाही. गरजेनुसार लहान मोठे बदल शिक्षण प्रणालीत होत गेले. उन्हाळ्याच्या सुट्ट्या इंग्रज भारतात येण्याआधी नव्हत्या. इंग्रजांना ऊन सहन होत नसे, यामुळे त्यांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्या देणे सुरू केले. आपल्या शिक्षण धोरणात अखेरचा बदल 1986 साली झाला आणि त्यानंतर तब्बल 34 वर्षांनी ऐतिहासिक क्रांतिकारी बदल शिक्षण धोरणात केंद्र शासनाने  केला. हा बदल नक्कीच येणाऱ्या पुढल्या पिढीसाठी फायद्याचा ठरेल.

गोंदिया जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष, तसेच शिक्षण सभापती म्हणून काम करत असताना मला अनेक त्रुटी शिक्षण क्षेत्रात जाणवत होत्या. ‘गावची शाळा, आमची शाळा’ संकल्पना राबवताना शाळेचा दर्जा सुधारण्यात मदत तर झाली, पण शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे यासाठी नवे शिक्षण धोरण असले पाहिजे, असे माझे मत होते. आता नव्या शिक्षण धोरणाने विद्यार्थ्यांवर पडणारा शैक्षणिक ताण कमी होणार असून, त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेता येणे सोपे होणार आहे.

आतापर्यंत भारतीय शिक्षण व्यवस्था 10 + 2 च्या पद्धतीने सुरू होती. मात्र आता ती 5 +3 + 3+ 4 च्या पद्धतीने होणार आहे. यात पहिले 5 वर्ष फाउंडेशन वर्ष म्हणून मानले जातील. यात मुलांना पुस्तकी ज्ञानासोबत खेळांच्या माध्यमातून शिक्षण दिले जाईल. पुस्तकांचा भार आधीसारखा असणार नाही. पुढील 3 वर्ष इयत्ता 3 री ते इयत्ता 5 वी यात मुलांना गणित, विज्ञान, इतिहास, कला सारखे विषय शिकवण्यात येतील. तसेच पुढील टप्प्यात इयत्ता 6 वी  ते इयत्ता 8 मध्ये नियोजित पाठ्याक्रमानुसार शिक्षण देण्यात येईल. इयत्ता 9 वी ते इयत्ता 12वी या फॉर्मट अंतर्गत शेवटची स्टेज असेल. यात विद्यार्थी वर्गात कोणत्याही विषयाबद्दल जिज्ञासा निर्माण करण्यात येईल, तसेच मोठे लक्ष्य निर्धारित करण्यासाठी प्रेरितसुद्धा करण्यात येईल.

सर्वात महत्वाचे, यात आधीसारखी ‘स्ट्रिम सिस्टम’ नसणार. यामुळे कला शाखेचा विद्यार्थी जर एखादा विज्ञानाचा विषय शिकू इच्छित असेल किंवा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी इतिहास शिकू इच्छित असेल, तर त्याला तसे शिक्षण घेता येईल. नव्या शिक्षण धोरणाने आपण आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्सचे विषय सोबत शिकणे शक्य होणार आहे. सर्वात महत्वाचे यात शिक्षण आपल्या मातृभाषते दिले जाईल. इयत्ता 6 वी नंतर विद्यार्थी कम्प्युटर प्रोग्रामिंग सुद्धा शिकतील. याने आपला देश लहान वयातच मुलांना सॉफ्टवेअर आणि मोबाइल ऍप्स तयार करण्याचे शिक्षण देऊ शकेल. तसेच विद्यार्थी  कोणत्याही क्षेत्रात किमान 10 दिवसांची इंटर्नशिप करु शकतील आणि एखाद्या विषयात इंट्रेस्ट असेल, तर त्यासंबंधी  ज्ञान प्राप्त करु शकतील. इयत्ता 12 वीनंतरचे शिक्षण किमान 1 ते 4 वर्षांचे असेल. यात विद्यार्थ्यांनी जर 1 वर्षाने शिक्षण सोडले, तर त्यांना त्या आधारावर प्रमाणपत्र, 2 वर्षानी सोडले तर पदविका तसेच 3 वर्षांत पूर्ण केले, तर पदवी प्रदान करण्यात येईल. तसेच 4 वर्ष पूर्ण केल्यावर विद्यार्थ्याना संशोधनाची पदवी मिळेल.

अशा पद्धतीने विद्यार्थ्याना सर्वगुण संपन्न बनवणाऱ्या व भावी पिढीच्या उज्जवल भविष्याचा विचार करणाऱ्या नव्या शिक्षण धोरणाचे एक माजी शिक्षण सभापती म्हणून मी स्वागत करतो.

आमदार विनोद अग्रवाल

 गोंदिया विधानसभा क्षेत्र (महाराष्ट्र)

(आ. विनोद अग्रवाल हे जि. प. गोंदियाचे माजी शिक्षण सभापती आहेत.)


(इथे प्रकाशित होणाऱ्या लेख, साहित्य व विचारांशी हे लेखकांचे वैयक्तिक मत असून, त्यांविषयी मराठी ब्रेन सहमत असेलच असे नाही.)

Join @marathibraincom

लेखावरील आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या प्रतिक्रिया चौकटीत नक्की नोंदवा !

अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इत्यादी. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: