प्रदूषणासाठी बीपीसीएल, एचपीसीएलसह चार कंपन्यांना ₹२८६ कोटींचा दंड
दंडाची ही रक्कम संबंधित भागातील हवा प्रदूषणाची स्थिती पूर्वपदावर आणण्याची योजना तयार करण्यासाठी व योजाव्या लागणाऱ्या उपायांवर खर्च करण्यात येणार आहे.
ब्रेनवृत्त | मुंबई
ईशान्य मुंबईतील अंबापाडा, माहुल व चेंबूर या भागांची अवस्था हवा प्रदूषणामुळे ‘गॅस चेंबर’सारखी झाली असून, या परिसरात राहणाऱ्या लाखो नागरिकांच्या आरोग्यास गंभीर स्वरूपाचा धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी कारवाई म्हणून राष्ट्रीय हरित लवादाने (NGT : National Green Tribunal) भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, सी लॉर्ड कन्टेनर्स आणि एजिस लॉजिस्टिक्स या चार कपन्यांना एकूण २८६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची ही रक्कम संबंधित भागातील हवा प्रदूषणाची स्थिती पूर्वपदावर आणण्याची योजना तयार करण्यासाठी व योजाव्या लागणाऱ्या उपायांवर खर्च करण्यात येणार आहे. तसेच, हवेच्या प्रदूषणाने नागरिकांना सोसाव्या लागणाऱ्या आरोग्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठीही ही रक्कम वापरली जाईल.
● चार कंपन्यांवर तब्बल ₹२८६ कोटींचा दंड
हवा प्रदूषणास मुख्यत्त्वाने कारणीभूत असलेल्या चार प्रत्येकी दंडाचा किती हिस्सा आकारण्यात यावा व त्याचे पैश्याच्या स्वरूपात मूल्य किती असेल, याच्या हिशेबाचे काम न्यायाधिकरणाने ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’वर (CPCB : Central Pollution Control Board) सोपविले होते. यासंबंधीचा अहवाल मंडळाने गेल्या मार्चमध्येच सादर केला. त्यानुसार हिंदुस्तान पेट्रोलियमला ७६.५ कोटी रुपये, भारत पेट्रोलियमला ७२.५ कोटी रुपये, एजिस लॉजिस्टिक्सला १४२ कोटी रु., तर सी लॉर्ड कन्टेनर्सला २० लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
वाचा | दिल्लीत उभारण्यात आले ‘पहिले स्मॉग टॉवर‘
आता विविध बाजूंचा विचार करून पर्यावरण हानी भरून काढण्यासाठी हा दंड ठोठावण्याचे लवादाने जाहीर केले आहे. दंडाची ही रक्कम जेव्हा गरज पडेल, तेव्हा खर्च करण्यासाठी दोन्ही पेट्रोलियम कंपन्यांनी स्वतंत्र खात्यांत, तर अन्य दोन कंपन्यांनी अतिरिक्त खात्यात सुरक्षित ठेवायची आहे.
सहभागी व्हा 👉 मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in