मानवी चाचणीत ऑक्सफर्ड विद्यापीठाला यश !

वृत्तसंंस्था | नवी दिल्ली

अमेरिकेतील ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोना विषाणूवर विकसित करण्यात येत असलेल्या लसीच्या मानवी परीक्षणाचे निकाल सकारात्मक मिळाले आहेत. ही लस कोरोना विषाणूविरोधात मानवी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते. या संदर्भातील माहिती लवकरच द लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकेेत प्रकाशित केली जाणार आहे.

कोव्हिड-१९‘वर लस बनविण्यासाठी जगभरातील अनेक वैद्यकीय संस्था युद्धपातळीवर कार्यरत आहेत. मात्र ऑक्सफर्ड विद्यापीठाला मिळालेल्या या यशाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अमेरिकेतील हीलस जेनर इन्स्टिट्यूटच्या ‘एझेडडी १२२२’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्थेने ही लस विकसित केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मानवी परीक्षणातील पहिल्या टप्प्यात १८ ते ५५ वयोगातील १०७७ कोरोना बाधित रुग्णांवर या लसीची चाचणी करण्यात आली. यातून हे सकारात्मक परिणाम मिळाले आहेत. जेनर इन्स्टिट्यूटची ही लस शरीरात प्रतिजैविक (अँटीबॉडीज) आणि किलर टी-सेल्स बनवण्यात मदत करु शकते. यामुळे मानवी शरीरातील कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होईल.

वाचा : ‘कोव्हिड-१९’वर भारतीय बनावटीची लस तयार !

दरम्यान, पुणे स्थित सिरम इन्स्टिट्युटनेही ही लस विकसित करण्यासाठी ऑक्सफर्डसोबत कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. सिरम संस्थेचे अध्यक्ष आदर पुनावाला यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्याचं यश आता फार महत्त्वाचं ठरणार आहे. सिरम संस्थेकडे या लसीचे कोट्यवधी डोस तयार असून, या लसीच्या मानवी चाचणीची परवानगी घेतली आहे.

एकीकडे ऑक्सफर्ड विद्यापीठाची मानवी चाचणीतील पहिल्या टप्प्यातील लस विकसित झाली आहे. तर दुसरीकडे भारतातही कोरोनाची लस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हैदराबादच्या भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या औषध कंपनीने कोरोनाला प्रतिबंध करणारी लस बनवली आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेकडून (एनआयव्ही) लसीच्या मानवी चाचण्यांना परवानगी मिळाली आहे.

विशेष बाब म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच आयसीएमआरने १५ ऑगस्टपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करुन देण्याचे आवाहन भारत बायोटेक कंपनीला केलं आहे. तसेच, मानवी चाचण्यांच्या सर्व टप्प्यांच्या संशोधनासाठी हा कालावधी अपूर्ण आहे, अशा चर्चाही मोठ्या प्रमाणात झाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: