“संघ थकला आहे, खेळाडूंना विश्रांती हवी असते!”

वृत्तसंस्था । रॉयटर्स

ब्रेनवृत्त । दुबई 


कोव्हिड-१९ च्या महासाथीमुळे ओढवलेला त्राण आणि त्यानंतर सलग सहा महिन्यांपासून मैदानांवर असलेले खेळाडू यांमुळे भारतीय संघाला मोठ्या थकव्याचा (Bubble Fatigue) सामना करावा लागत आहे आणि त्याचे परिणाम जाणवत आहेत. त्यासाठी खेळाडूंना विश्रांती हवी असते, असे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने म्हटले आहे. काल रात्री न्यूझीलंडबरोबर झालेल्या सामन्यातील पराभवानंतर जसप्रीत माध्यमांशी बोलत होता.

काल (रविवारी) टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 12 टप्प्यात न्यूझीलंडकडून आठ गडी राखून पराभूत झाल्यानंतर भारताची गट २  मध्ये पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. यामुळे, उर्वरित तीन सामने जिंकून देखील उपांत्य फेरीत स्थान मिळेलच हे निश्चित नाही. दरम्यान, या भारताच्या या अशा वाईट पराभवासाठी असलेले मोठे कारण वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने स्पष्ट केले आहे. मागील सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापासून भारतीय खेळाडू मैदानावर आहेत आणि त्यांना विश्रांतीची गरज आहे, असे तो म्हणाला.

 हेही वाचाआयसीसी क्रमवारीत कोहलीची घसरण; पराभवाचा मोठा फटका!

एप्रिलमध्ये इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) हंगाम सुरू झाल्यापासून भारतीय संघाचे खेळाडू मैदानांवर आहेत. अर्धवट राहिलेली आयपीएल स्पर्धा सप्टेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये पुन्हा सुरु होण्यापूर्वी भारतीय कसोटी संघाने इंग्लंडचाही दौरा केला होता. आयपीएल संपल्याच्या लगेच एक आठवड्यानंतर टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरु झाली, त्यामुळे या सगळ्याचा चांगलाच परिणाम खेळाडूवर झाला आहे. 

आयपीएलच्या हंगामानंतर संघाला थकवा आला आहे का? असे विचारले असता, बुमराहने पत्रकारांना सांगितले, “नक्कीच, कधीकधी तुम्हाला विश्रांतीची आवश्यकता असते. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आठवण येत असते. गेल्या सहा महिन्यांपासून तुम्ही मैदानावर असता.” जसप्रीत पुढे असेही म्हणाला, “या सर्व गोष्टी कधी कधी तुमच्या मनात चालत असतात. पण जेव्हा तुम्ही मैदानात असता, तेव्हा तुम्ही त्या सर्व गोष्टींचा विचार करत नाही. साहजिकच, इतक्या दिवसांपासून बबलमध्ये राहणे आणि तुमच्या कुटुंबापासून दूर राहणे, या सगळ्यांचा परिणाम तुमच्यावर होत असतो.” 

अबब! कोटींच्या बोलीसह आयपीएलमध्ये दोन नव्या संघांचा समावेश!

दुसरीकडे, भारतीय  क्रिकेट नियंत्रण मंडळाची यावरील भूमिका कशी आहे याविषयीही बुमराहने माध्यमांना सांगितले. “आम्हाला आरामदायी वाटावे यासाठी बीसीसीआयही सर्वतोपरी प्रयत्न करत असते. ही एक कठीण वेळ आहे. महासाथरोग सुरू आहे, त्यामुळे आम्ही परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, पण कधी कधी थकवा येतो. मानसिक थकवाही येतो.”

 

आमच्या टेलिग्राम वाहिनीत सहभागी व्हा 👉 मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी www.marathibrain.in सोबत जुळून रहा ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: