वृत्तसंस्था
उदयपूर, १ डिसेंबर
पाकिस्तानवर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी वापर केला असल्याचा आरोप कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. ते उदयपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात जनतेला संबोधित करत होते.
उदयपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण केले असल्याचा आरोप लावला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात जे एक सर्जिकल स्ट्राईक झाले, तसे तीन सर्जिकल स्ट्राईक माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातही झाले होते. मात्र ते गुप्त ठेवण्यात आले. अशा गोष्टी गुप्तच ठेवाव्या लागतात, मात्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईकची बाब जगजाहीर करून स्वतःचा राजकीय फायदा करून घेतला. त्यांनी स्ट्राईकचे राजकारण केले.’
हेही वाचा : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक?
मोदींना ‘इतिहास’तरी माहीत आहे का? : कपिल सिब्बल
पुढे राहुल गांधी असेही म्हणाले की, भाजपने बँकिंग क्षेत्रातही नको ती उलथापालथ केली आहे. काँग्रेसच्या काळात २ लाख कोटी एनपीए होता. तोच एनपीए भाजपच्या काळात १२ लाख कोटींवर पोहचला आहे. सोबतच, सरकारने १५ ते २० उद्योजकांचे कर्जही माफ करून टाकले आहे, असाही आरोप गांधींनी लावला आहे.
◆◆◆
Like this:
Like Loading...
हेही वाचा