पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार मणिपूर पाणी पुरवठा प्रकल्पाचे भूमीपूजन

राज्यातील उर्वरित भागांमध्ये नळाचे पाणी पूरवण्यासाठी मणिपूर पाणी पुरवठा प्रकल्प (Manipur Water Supply Project)आखण्यात आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत महा-इंफाळ नियोजित क्षेत्र, २५ लहान शहरे आणि १६ जिल्ह्यांतील १,७३१ ग्रामीण वासहतींमधील एकूण २,८०७५६ घरांना पेयजल पुरवठा केला जाईल.

 

एएनआय | नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून मणिपूर पाणी पुरवठा प्रकल्पाच्या भूमीपूजनाची आधारीशीला ठेवतील. या प्रकल्पांतर्गत मणिपूर राज्यातील सुमारे २ लाख ८० हजार घरांना नळाचे पाणी पुरवठा करणे अपेक्षित असून, हा प्रकल्प २०२४ पर्यंत ‘हर घर जल’ योजनेचे ध्येय पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या प्रयत्नांचा महत्त्वपूर्ण अंग आहे.

‘जल जीवन अभियान’ (Jal Jeevan Mission) अंतर्गत मणिपूरमधील गावांमध्ये घरघुती पेयजल नळजोडणी (FHTCs : Freshwater Household Tap Connections) देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने माणिपूरला निधी पुरवला आहे. या निधीच्या साहाय्याने राज्यातील १,१८५ वासहतींमधील एकूण १,४५,७४९ घरांना नळाचे पाणी पुरवठा होणे अपेक्षित आहे.

राज्यातील उर्वरित भागांमध्ये नळाचे पाणी पूरवण्यासाठी मणिपूर पाणी पुरवठा प्रकल्प आखण्यात आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत महा-इंफाळ नियोजित क्षेत्र, २५ लहान शहरे आणि १६ जिल्ह्यांतील १,७३१ ग्रामीण वासहतींमधील एकूण २,८०७५६ घरांना पेयजल पुरवठा केला जाईल. हा प्रकल्प पूर्णतः बाह्य अनुदानित असून, यासाठी ३,०५४.५८ कोटी रुपयांचे खर्च अपेक्षित आहे. यासाठी नवविकास बँक (New Development Bank) कर्जपुरवठा करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या प्रकल्पाची आभास पध्दतीने आधारीशीला ठेवणार असून, या कार्यक्रमात मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला, मुख्यमंत्री एन बिरेन सिंग आणि मंत्रिमंडळ सदस्य, इंफाळमधील खासदार आणि आमदार उपस्थित असणार आहेत.

वाचा : आसामचे पाणी थांबविण्यावर भूतानचे स्पष्टीकरण

जल जीवन अभियान (Jal Jeevn Mission)

‘प्रत्येक घरी पाणी’ (Har Ghar Jal) या बोधवाक्यासह २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरांना शुद्ध व पुरेसे पेयजल उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने जल जीवन अभियान सुरू केले आहे. या अभियानाद्वारे अनिवार्य घटक म्हणून स्रोत शाश्वततेचे मापणही केले जाते, ज्यामध्ये ग्रे वॉटर (स्वयंपाकासाठी तसेच अंघोळीसाठी वापरले जाणारे पाणी) व्यवस्थापनद्वारे पूर्णवापर आणि पुनर्भरण, पाणी संरक्षण, पाऊसपाणी संवर्धन आदींचा समावेश आहे.

(संपादन व भाषांतरण : मराठी ब्रेन)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: