श्रद्धाचे हितचिंतकांसाठी मराठीत पत्र !

ब्रेनरंजन | मुंबई

बॉलिवूड सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री व मराठमोळ्या श्रद्धा कपूरने आज आपल्या हितचितकांना विशेष भेट दिली आहे. इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर ५ कोटी अनुसारकांचा टप्पा पार झाल्यानंतर श्रद्धाने आपल्या हितचिंतक, अनुसारकांना खास मराठीतून आभारपत्र लिहिले आहे. हे पत्र तिने ट्विट करत सर्वांचे आभार मानले आहे व आनंद व्यक्त केला आहे.

 

फॅन क्लब्स, हितचिंतक, अनुसारकांनी श्रद्धासाठी वेळोवेळी टाकलेले पोस्ट्स आणि चित्रफिती बघून खूप आनंद झाल्याचे व मन भरून आले असल्याचे श्रद्धाने या पत्रात लिहिले आहे. सोबतच, आभार स्वरूपात प्रेम आणि शुभेच्छा देत सर्वांना काळजी घेण्याचेही श्रद्धाने म्हटले आहे. विशेष म्हणजे, आपल्या अनुसारकांपैकी कुणालाही नाराज न करता श्रद्धाने हे पत्र खास इंग्रजी, हिंदीसह मराठीतही लिहिले आहे. त्यामुळे, श्रद्धाच्या मराठीतील आभारपत्राची विशेष चर्चा होऊ लागली आहे.

श्रद्धा लिहिते : “माझ्या सर्व प्रिय जेम्स, बाबुडी, चाहता वर्ग आणि हितचिंतकांनो, मी तुमच्या प्रेमाद्वारे बनवलेले व्हिडीओ आणि पोस्ट्स पहिल्या आणि माझे मन भरून आले. मी तुमच्या सर्वांमुळे इथे आज येथे आहे. तुम्हां सर्वांना माझ्याकडून भरपूर प्रेम. असेच सुखी आणि आनंदी रहा. कृपया स्वतःची काळजी घ्या आणि एकमेकांशी प्रेमाने रहा ! धन्यवाद! धन्यवाद ! धन्यवाद!”

दरम्यान, श्रद्धाने लिहिलेल्या मराठीतील आभारपत्राला मराठी ट्विटरकरांनीही विविधांगी प्रतिसाद दिला आहे व मराठीत ट्विटत राहावे अशी आशाही व्यक्त केली आहे.

 तब्बल तीन महिन्यांनी सई परतली सेटवर !

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: