केरळ आणि कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात आयएसआयएस’चे दहशतवादी : संयुक्त राष्ट्र

ब्रेनवृत्त, संयुक्त राष्ट्र 

भारतातील केरळ आणि कर्नाटकमध्ये आयएसआयएस (दाएश) या दहशतवादी संघटनेतील दहशतवाद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच भारतातील उपखंडांमधील अल-कायदा ही दहशतवादी संघटना भारतात मोठा हिंसाचार माजविण्यासाठी कट रचत असण्याची शक्यता आहे. अशी माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने एका अहवालामार्फत दिली आहे.

> भारतात नवा प्रांत बनविण्याचा दावा
या अहवालानुसार, ”गेल्या वर्षी मे महिन्यात इस्लामिक स्टेट (ज्याला आयएसआयएस, आणि दाएश असेही म्हटले जाते) दहशतवादी संघटनेने भारतात ”हिंद विलायाह” म्हणजेच नवीन “प्रांत” स्थापन करण्याचा दावा केला होता. काश्मीरमध्ये अतिरेकी आणि सुरक्षा दलातील चकमकीनंतर ही घोषणा करण्यात आली.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

> ओसामा मेहमूद आयएसआयएस’चा सध्याचा म्होरक्या
अहवालानुसार, केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये आयएसआयएसचे 180 ते 200 सदस्यही आहेत. तर बांगलादेश, भारत, म्यानमार आणि पाकिस्तानमधील 150 ते 200 सदस्य आहेत. एका चकमकीत ठार झाल्यानंतर अल- कायदा संघटनेचा म्होरक्या असीम उमरची जागा ओसामा मेहमूदने घेतली आहे. आपल्या आधीच्या म्होरक्याच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी अल-कायदा या भागात कट रचत असल्याच्या बातम्या आहेत. ”

>  अफगाणिस्तानातून सुरु आहे काम
आयएसआयएस, अल कायदा आणि संबंधित व्यक्ती आणि संस्थांशी संबंधित विश्लेषक सहाय्य आणि मंजुरी देखरेख दलाच्या 26 व्या अहवालात म्हटले आहे की, भारतीय उपखंडातील अल-कायदा अफगाणिस्तानच्या निमरूज, हेलमंद आणि कंधार प्रांतातील तालिबान अंतर्गत कार्यरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: