कालसर्प : योग की दोष?

“ज्योतिषशास्त्राशी संबंधित जे पौराणिक ग्रंथ आहेत, त्यांत कुठेही कालसर्प योग अथवा कालसर्प दोषचा उल्लेख आढळून येत नाही. आधुनिक ज्योतिषांनी ही संकल्पना मांडलेली आहे आणि अर्धवट ज्ञानाच्या जोरावर अनेकांनी त्याचा बाजार केलेला आहे.”

 

ब्रेनसाहित्य | लेख

आपल्याकडे ज्योतिषशास्त्राबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. ज्योतिष हे खगोलशास्त्र, गणित, तर्कशास्त्र आणि संभाव्यता यांवरवर आधारलेले एक शास्त्र आहे. अर्धवट ज्ञान असलेल्या ज्योतिषांमुळे हे शास्त्र बदनाम झालेले आहे. आजकाल कालसर्प दोष आणि त्याची शांती हा ज्योतिषांचा चर्चेचा (ट्रेंडिंग) विषय आहे. मुळात कालसर्प हा ‘योग’ आहे की ‘दोष’ हेच अनेकांना माहित नाही. त्यासाठी ‘कालसर्प योग/दोष’ म्हणजे नक्की काय? हे समजून घेण्याआधी आपण ‘कुंडली’ म्हणजे काय ते समजून घेऊ.

व्यक्तीच्या जन्मावेळी आकाशातील ग्रह ताऱ्यांच्या स्थितीचा नकाशा म्हणजे ‘कुंडली’. आपण पृथ्वीवर आहोत, आपण केंद्रस्थानी आणि आपल्या भोवती सारे ग्रह-तारे फिरत आहेत, असं ज्योतिषशास्त्रात मानले जाते. सूर्याची भ्रमण कक्षा आणि चंद्राची भ्रमण कक्षा एकमेकांना २ ठिकाणी छेदतात. ते २ छेदन बिंदू म्हणजे राहू आणि केतू. हे २ छेदन बिंदू एकमेकांपासून १८० अंशावर असतात. त्यामुळेच कुंडली मध्ये राहू केतू एकमेकांपासून सातव्या घरात असतात. (राहू पहिल्या घरात असेल तर केतू सातव्या घरात असतो.) अशावेळी राहूला सापाचे डोके आणि केतूला सापाचे शरीर मानले जात.

राहू केतू एकमेकांपासून १८० अंशावर असतात म्हणजेच ते कुंडलीचे २ भाग करतात. जेव्हा पत्रिकेतील सारे ग्रह राहू आणि केतूच्या कोणत्याही एकाच बाजूला असतात तेव्हा ‘कालसर्प योग’ तयार होतो. त्यातही राहू आणि केतूच्या स्थानांवरून कालसर्प योगाचे वेगवेगळे प्रकार आहेत.

ज्योतिषशास्त्राशी संबंधित जे पौराणिक ग्रंथ आहेत, त्यांत कुठेही कालसर्प योग अथवा कालसर्प दोषचा उल्लेख आढळून येत नाही. आधुनिक ज्योतिषांनी ही संकल्पना मांडलेली आहे आणि अर्धवट ज्ञानाच्या जोरावर अनेकांनी त्याचा बाजार केलेला आहे. म्हणून ‘कालसर्प’ हा दोष नसून, ग्रहस्थितीने तयार झालेला ‘योग’ आहे. जगभरातील अनेक उच्च पदावर काम केलेल्या लोकांच्या कुंडली मध्ये कालसर्प योग होता. उदा. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, राज कुमार, अशोक कुमार, हेनरी फोर्ड, सद्दाम हुसेन, हिटलर, अकबर इ.

स्रोत : indastro.com

दरम्यान, आपल्या सभोवतालचे अनेक ज्योतिषी कालसर्प योगाची भीती घालून पैसे उकळण्याचे धंदे करतात. उलट तुम्ही स्वतः सुद्धा तुमची पत्रिका पाहून सांगू शकता की त्यात कालसर्प योग आहे कि नाही. आणि असेल तरी घाबरण्याचे काही कारण नाही. अर्धवट ज्ञानाच्या जोरावर ज्योतिषी बनलेल्या लोकांकडून मात्र फसू नका.

 

लेख : दिग्विजय विभुते 
ट्विटर : @Digvijay_004
ई-पत्ता : digvijayjvibhute@gmail.com

(लेखक अभियंता व नवउद्योजक असून, विविध विषयांवर स्वतंत्रपणे लिहितात.)

◆◆◆

(इथे प्रकाशित होणाऱ्या लेख, साहित्य व विचारांशी मराठी ब्रेन सहमत असेलच असे नाही.)

Join @marathibraincom

लेखावरील आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या प्रतिक्रिया चौकटीत नक्की नोंदवा !

अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इत्यादी. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहाwww.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: