सोपं नसतं..!
ब्रेनसाहित्य | कविता
सोपं नसतं
रोज राब राब राबून
कधी अर्धपोटी उपाशी राहून
काळ्या मायच्या उदरातून
मोत्यागत धान्य पिकवणं..त्यासाठी सोसावं लागतं
सावकाराचं, बँकेतल्या सायबांच,
अधिकाऱ्यांसह कर्मचारी लोकांचं
खालच्या पातळीवरील बोलणं.श्रीमंती फक्त घरातल्या
टी.व्ही. संचावरच चांगली वाटते
ती पहावी अशी
असते ‘श्रीमंती’ म्हणून.कधीकाळी दोन-चार हजारांची
गरज पडली तेव्हा,
विचार करावा लागतो मागावे कुणाला?
की विकावं कुणी घेणार असेल
तर स्वतःलाच?सोपं नसतं इतरांना दोन घास
चांगले मिळावे म्हणून,
आपल्या स्वप्नांना मूठमाती देत
‘शेतकरी’ होणं…
– तुषार भा. राऊत
ई-पत्ता : rautt9948@gmail.com
मो. नं. ८४०७९६३५०९
◆◆◆
(इथे प्रकाशित होणाऱ्या लेख, साहित्य व विचारांशी मराठी ब्रेन सहमत असेलच असे नाही.)
Join @marathibraincom
विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.