बांधकाम विभागात मराठा आरक्षणानुसार ३४ पदांवर नियुक्ती

एसईबीसी प्रवर्गाला नोकऱ्यांमध्ये जाहीर झालेल्या १३टक्के आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. ३४ पदांवर मराठा समाजातील उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने जाहीर केले आहे.

 

ब्रेनवृत्त, १३ जुलै २०१९

राज्यात नव्याने तयार करण्यात आलेल्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाला (एसईबीसी) नोकऱ्यांमध्ये १३ टक्के आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रथमच सार्वजनिक क्षेत्रात नियुक्तीला सुरुवात झाली आहे. सार्वजनिक बांधकाम क्षेत्र हे एसईबीसी प्रवर्गाला नियुक्तीत लाभ देणारे पहिले क्षेत्र ठरणार आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर नुकतीच सुनावणी होऊन नोकरीमधील नियुक्त्यांमधे एसईबीसी प्रवर्गाला १३ टक्के आरक्षण देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार विविध क्षेत्रात होणाऱ्या नियुक्त्यांमधे या आरक्षणाचा लाभ संबंधित प्रवर्गातील लोकांना देण्यास सुरुवात झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ‘गट ब’ च्या अंतर्गत भरण्यात येणाऱ्या कनिष्ठ स्थापत्य अभियंता (ज्युनिअर इंजिनीअर-सिव्हिल) च्या ३४ रिक्त जागांवर एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती १३ टक्के आरक्षणानुसार करण्यात आली आहे. यामुुुळे चंद्रकांत पाटील यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग हे एसईबीसी आरक्षणाची राज्यात प्रथम अमंलबजावणी करणारे विभाग ठरले आहे.

मराठा आरक्षण विधेयक मंजूर ; एसईबीसी ला १६% आरक्षण

राज्यात मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाचे आरक्षण लागू झाल्यानंतर भरती प्रक्रियेत सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. इतर पदांसाठीच्या भरती प्रक्रियेमध्येही एसईबीसी प्रवर्गातील रिक्त पदेदेखील तातडीने भरण्याची कार्यवाही सुरु असल्याचे, सार्वजनिक बांधकाम आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

फेब्रुवारीपासून लागू होणार १०% आरक्षण

सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 31 डिसेंबर 2019 पर्यंत रिक्त होणाऱ्या 405 संभाव्य कनिष्ठ स्थापत्य अभियंता पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर 300 पदांच्या भरतीचे आदेश काढण्यात आले आहे.  यामध्ये एसईबीसी प्रवर्गातील 34 उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

◆◆◆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: