उजनी तलाव १००% च्या वर!

दुष्काळी पट्टा म्हणून समजले जाणार्‍या सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या उजनी जलाशयाच्या पाणीपातळी १००% च्या वर झाली असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे! पावसाळा संपत आला तरी समाधानकारक पाऊस नसूनही धरण इतर ठिकाणी पाऊस पडल्याने भरले आहे.  संपूर्ण राज्यातील मोठ्या पाणीसाठ्यापैकी एक असणारं उजनी पूर्ण क्षमतेने भरल्याने जवळपास चार जिल्ह्यातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची मोठी चिंता मिटली आहे.

उजनी धरणावर पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर या चार जिल्ह्यातील शेतकरी, उद्योजक अवलंबून आहेत, धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पुढील काही महिन्याची चिंता तूर्तास मिटली आहे!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: