ब्रेनविशेष । ‘महापरिनिर्वाण दिन’च्या निमित्ताने…
ब्रेनविशेष । अजय बर्वे
भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. त्यांच्या कार्याला व अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला आदरांजली देण्यासाठी दरवर्षी ६ डिसेंबर हा दिवस ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून साजरा केला जातो.
आज 6 डिसेंबर 2021 भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची 65 वी पुण्यतिथी आहे. समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री असणारे बाबासाहेब आंबेडकर यांनी ६ डिसेंबर १९५६ रोजी झोपेतच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या स्मृतीत हा दिवस ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून गणला जातो.
डॉ. भीमराव आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुरात बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी औपचारिकरित्या सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केला होता. या सोहळ्यात त्यांनी श्रीलंकेतील महान बौद्ध भिक्खू महात्थवीर चंद्रमणी यांच्याकडून पारंपारिक पद्धतीने त्रिरत्न आणि पंचशील ग्रहण करत बौद्ध धर्म स्वीकारला.
ब्रेनविशेष । ‘लोकशाहीरां’च्या साहित्यातले ‘लोकमान्य’!
सन 1956 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मावरील त्यांचे शेवटचे पुस्तक ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ लिहिले. हे पुस्तक 1957 मध्ये, म्हणजेच त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. भारतीय संविधानाचा पाया रचणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आजच्या राजकारणाचे असे आधारस्तंभ आहेत, की ज्यांना कोणीही नाकारू शकणार नाही. डॉ. आंबेडकर आजही तितकेच समर्पक दिसतात. आंबेडकरांनी भारतीय समाजातील कुप्रथा, अस्पृश्यता आणि भेदभाव नष्ट करण्यासाठी खूप मोठा संघर्ष केला.
सहभागी व्हा👉मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in