गेल्या ८ महिन्यांत देशात डिजिटल व्यवहारांमध्ये ८०% वाढ!

ब्रेनवृत्त । पुणे


मागील २५० दिवसांमध्ये भारतात डिजिटल व्यवहारांमध्ये (Digital Transactions) तब्बल ८० टक्क्यांनी वाढ झाल्याचे एका पाहणीतून समोर आले आहे. सोबतच, घरघुती सेवा (होम सर्व्हिसेस) जसे की, सुतारकाम, नळ, मोऱ्या वगैरेची कामे (प्लम्बिंग) व इतर अशा उद्योगांनीही डिजिटल व्यवहारांचा अवलंब या कालावधीत सुरु केला आहे. त्यामुळे देशातील एकूण आर्थिक व्यवहारांपैकी डिजिटल व्यवहार चक्क १३८% वर पोहचले आहे.

रेझरपे (Razorpay) या आर्थिक उपायात्मक कंपनीने (financial  solutions company) भारतातील विविध आर्थिक क्षेत्रात गेल्या २५० दिवसांत (३० नोव्हेंबर २०२० ते ६ ऑगस्ट २०२१) झालेल्या डिजिटल व्यवहारांवर अभ्यास केला असून, त्यासंबंधी एक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, गेल्या २५० दिवसांमध्ये भारतात डिजिटल व्यवहारांमध्ये तब्बल ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

वाचा । इंटेल व सीबीएसई राबवणार ‘सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता’ उप्रकम!

देशात डिजिटल व्यवहारांमध्ये सर्वाधिक वाढ ही २ऱ्या व ३ऱ्या श्रेणीच्या शहरांमध्ये झाली आहे. या शहरांमध्ये पहिल्या २५० दिवसांपासून (२५ मार्च २०२० ते २९ नोव्हेंबर २०२०) तर नंतरच्या २५० दिवसांमध्ये (३० नोव्हेंबर २०२० ते ६ ऑगस्ट २०२१) डिजिटल व्यवहार ४० टक्क्यांनी वाढले आहेत.

रेझरपेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक हर्षील माथूर म्हणाले, “गेल्या 250 दिवसांत एकाही क्षेत्राने नकारात्मक वाढ दर्शविली नाही याचा मला खरोखरच आनंद होत आहे. व्यवसाय वाढीस समर्थन देण्यासाठी आणि ते सुधारण्यासाठी नवीन पेमेंट तंत्रज्ञान वापरण्याचे महत्त्व व्यवसायांनी ओळखले आहे. त्यामुळेच हे शक्य झाले आहे.”

सुरुवातीला जवळपास प्रत्येक क्षेत्रात डिजिटल व्यवहारांमध्ये भरारी अनुभवायला मिळाली होती. मात्र 2020 च्या सुरुवातीला ऑनलाईन देयक व्यवहारांमध्ये 30 टक्क्यांनी घट झाली. पण त्यानंतर लहान व्यवसाय, अर्थतंत्रज्ञान (फिनटेक) कंपन्या आणि बँक पारिस्थितिकी एकत्रित आल्या आणि आज डिजिटल व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

हेही वाचा । भारताच्या अंदाजित वृद्धीदरात मूडीजद्वारे कपात!

सोबतच, आता खरेदी, नंतर पैसे द्या (बीएनपीएल) सारख्या देयक पर्यायांची मागणी वाढत आहे आणि त्यांमध्ये 220 टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. तसेच, देशव्यापी टाळेबंदीच्या (लॉकडाऊन) पहिल्या 250 दिवसांच्या तुलनेत मागील 250 दिवसांमध्ये थेट ग्राहकांपर्यंत (D2C) व्यवसयांमध्ये 87 टक्के वाढ झाली आहे.

 

आमच्या टेलिग्राम वाहिनीचे मोफत सभासद व्हा : @marathibrainin


विविधांगी माहिती थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.in वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: