भारताने ८व्यांदा जिंकले सॅफ अजिंक्यपद; सुनील छेत्रीची मेस्सीशी बरोबरी!
मराठी ब्रेन ऑनलाईन
ब्रेनवृत्त । माले
भारतीय फुटबॉल संघाने काल सॅफ चॅम्पियनशिपच्या (SAFF Championship) अंतिम सामन्यात नेपाळचा ३-० ने पराभव करत ८व्यांदा सॅफचे अजिंक्यपद आपल्या नावे केलेला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने सामन्याच्या ४९ व्या मिनिटाला गोल करून नव्या विक्रमाची नोंद केली. सुनील छेत्रीने अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या ८० आंतरराष्ट्रीय गोलची बरोबरी केली आहे.
नेपाळचा संघ पहिल्यांदाच सॅफ चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. भारतीय संघातील छेत्री, सुरेश सिंग आणि सहल अब्दुल समद यांनी अनुक्रमाने ४९, ५० आणि ९० व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे भारताला विजयश्री मिळाली. पूर्वार्धात भारताने चेंडू नियंत्रणावर नियंत्रण मिळवले होते, पण गोल करता आला नाही. छेत्रीने दुसऱ्या हाफच्या अवघ्या काही मिनिटांतच गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. त्याच्या एक मिनिटानंतर सुरेशने परत एक गोल केला.
हेही वाचा । खेळरत्न पुरस्काराचे ‘मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार’ असे पुनर्नामकरण!
सॅफ चॅम्पियनशिपच्या (SAFF Championship) भारताचे हे ८ वे अजिंक्यपद आहे. तर संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅकसह भारताचे हे पहिले विजेतेपद आहे. जिरी पेसेक (१९९३) आणि स्टीफन कॉन्स्टँटाईन (२०१५) यांच्यानंतर इगोर हे तिसरे परदेशी प्रशिक्षक आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने जेतेपद पटकावले आहे.
Satisfied #BlueTigers 🐯 dedicate 8th SAFF title to 'team spirit', ✍️ @DattaNilanjan 🙌
Read 👉 https://t.co/tPLWjLSb3T#SAFFChampionship2021 🏆 #BackTheBlue 💙 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/NXrHHYvixa
— Indian Football Team (@IndianFootball) October 17, 2021
सध्या सक्रिय फुटबॉलपटूंमध्ये सर्वाधिक ११५ आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा विक्रम पोर्तुगालचा स्टार खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या नावावर आहे. काल झालेल्या सामन्यानंतर या यादीत मेस्सी आणि छेत्री संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दोघांच्याही नावे ८०-८० आंतरराष्ट्रीय गोल आहेत.
सहभागी व्हा 👉 मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in