कोरोनामुक्त बालके परत रुग्णालयांच्या वाटेवर!

ब्रेनवृत्त । नवी दिल्ली


कोव्हिड-१९ संसर्गापासून मुक्त झालेल्या लहान मुलांमध्ये परत नवी  लक्षणे आढळू लागली असून, कित्येक मुले-मुली दिल्लीच्या रुग्णालयांमध्ये परत दाखल होत आहेत. कोव्हिड-१९ नंतर (post-COVID-१९) मुलांमध्ये दिसणाऱ्या या लक्षणांमध्ये प्रामुख्याने पोटाचे विकार, डोकेदुखी, श्वासोच्छवासाचा त्रास, विचारक्षमतेवर प्रभाव (ब्रेन फॉग) आदींचा समावेश आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोव्हिड-१९ झालेल्या मुलांमध्ये ही लक्षणे पुढील ३-४ महिने कायम राहू शकतात.

छायाचित्र स्रोत : NewsBytes

कोव्हिड-१९ झाल्यानंतर लहान मुलांमध्ये दिसणारी ही नवी लक्षणे कमी होण्यासाठी अधिक वेळही लागू शकतो असे तज्ज्ञ सांगतात. फोर्टिस रुग्णालयातील डॉ. राहुल नागपाल यांनी पीटीआयला सांगितल्याप्रमाणे, कोव्हिड-१९ नंतर लक्षणे आढळणाऱ्या बालकांपैकी १ ते ३% प्रकरणांमध्ये त्यांना मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेट्री सिंड्रोम (MSIC) आढळले आहे.

“अनेक रुग्णांमध्ये डायरिया, अंगदुखी, थकवा आणि पचनसंस्थेशी संबंधित समस्याही दिसल्या आहेत”, असे नागपाल म्हणतात. त्यामुळे ही लक्षणे कोव्हिड-१९ ची आहेत की नाही हे निश्चित करण्यासाठी या प्रकारणांवर अधिक अभ्यास होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

वाचा । अंगणवाडी व कुपोषणारील परिणामांचे सर्वेक्षण करण्याच्या शासनाला सूचना !

> बालकांमध्ये मानसिक आजारांची शक्यता 

दरम्यान, एमसीआयसी हे बालकांमध्ये कोव्हिडनंतर दिसणारे सर्वसामान्य लक्षण असले, तरीही याचा मुलांवर मानसिक परिणाम होतो. मॅक्स रुग्णालयाचे डॉ. कुकरेजा म्हणतात, “कमी झालेले सामाजिक संवाद, घरच्या घरी रहाणे आणि कोव्हिड-१९ची भीती यांमुळे बालकांच्या मानसिकतेवर खूप मोठा आघात होत आहे.” ज्यांच्या कुटुंबात कोरोना विषाणूमुळे कुणाचातरी मृत्यू झाला आहे, अशा घरांमधील बालके रुग्णालयात जाण्यासाठी घाबरतात, असे निरीक्षण कुकरेजा यांनी नोंदवले आहे.

वाचा । शरीरातील रोगप्रतिकार शक्ती अल्फा, बिटाशी लढण्यात असमर्थ!

दुसरीकडे, बालकांमध्ये अचानक झालेली लक्षणांची ही वाढ कोरोना विषाणूच्या डेल्टा उत्परिवर्तीत प्रकारामुळे (Delta Mutant Variant) तर नाही, याविषयी स्पष्ट मत अजून कुणी व्यक्त केलेले नाही. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की विषाणू जेव्हा उत्परिवर्तित होतो, तेव्हा त्यांची घातकता कमी कमी होत जाते, त्यामुळे डेल्टाचा प्रभाव लहान मुलांवर तुलनेने कमी असेल. तर काहींच्या मते, लसीकरणाचा असलेला मंद वेग आणि विषाणूचे वेगाने होणारे उत्परिवर्तन यांमुळे डेल्टा प्रकार बालकांमध्ये घातक ठरू शकतो.

 

Join @ मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: