‘माय बाप सरकार, एसटी सुरु करा!’

मराठी ब्रेन प्रतिनिधी

ब्रेनवृत्त । भंडारा


गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे (एमएसआरटीसी) शासनात विलिनीकरण करण्यात यावे यासाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी अनिश्चितकालीन संपाचे हत्यार उपसले आहे. संपातील मागण्यांवर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. राज्य शासनाने संप मागे घेण्याचे आवाहन केले असले, तरी कर्मचारी मागण्यांवर ठाम असून माघार घेण्यास तयार नाहीत. 

हेही वाचा । राज्य शासनाची एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट!

कित्येक दशकांपासून राज्याची जीवनरेखा म्हणून नावाजलेली राज्य परिवहन (स्टेट ट्रान्सपोर्ट) सेवा मागील 20 पेक्षा अधिक दिवसांपासून बंद आहे. रस्त्यांवर ‘लाल परी’ नजरेस पडत नसल्याने ग्रामीण भागातील जनतेचे मोठ्या प्रमाणात बेहाल झाले आहेत. नाईलाजाने लोकांना प्रवासासाठी अतिरिक्त पैसे मोजून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासनाने परिवहन विभागाशी चर्चा करून लवकरात लवकर राज्य परिवहन विभागातील बस सेवा पूर्ववत सुरु करावी, अशी मागणी सामान्य जनता करत आहे

राज्यातील बहुतांश ग्रामीण जनता मोठ्या प्रमाणात राज्य परिवहनाच्या बस सेवेवर (एसटी) अवलंबून आहे. राज्याची सार्वजनिक परिवहन सेवा बंद असल्यामुळे सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील जनेतला होताना दिसत आहे. दुसरीकडे, परिवहन महामंडळ राज्य शासनामध्ये विलीन केल्याशिवाय आम्ही कामावर हजर राहणार नाही, अशी भूमिका कर्मचारी संघटनांनी घेतली आहे. त्यामुळे आता न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नक्की वाचा । शासनाची खरी दिवाळी; ऑक्टोबरमध्ये १.३० लाख कोटींचा जीएसटी!

न्यायालयीन निर्णयासोबतच या सगळ्या प्रकरणात राज्य शासन कोणती भूमिका घेईल हेही महत्त्वाचे असणार आहे. एसटी कामगारांचे प्रश्‍न कायमस्वरुपी निकाली काढून लालपरीला पुन्हा उर्जितावस्था आणण्यासाठी राज्य शासन काही उपाययोजना करेल का, याकडेही अनेकांचे लक्ष लागून आहे. 

 

सहभागी व्हा 👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: