पिंपरी चिंचवड । पोलीस नाईक रश्मी धावडे यांची नेमबाजीत कांस्य पदकाला गवसणी!

ब्रेनवृत्त । पुणे


पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील नाईक रश्मी धावडे यांनी पुन्हा एकदा नेमबाजी स्पर्धेत पदकाला गवसणी घातली आहे. नुकत्याच गुजरामधील अहमदाबाद शहरात पार पडलेल्या ३० व्या अखिल भारतीय जी. व्ही. मावळणकर नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत (XXX All India G. V. Mavlankar Shooting Championship) त्यांनी कांस्य पदक जिंकून पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 10 मी. एअर पिस्टल प्रकारात पूर्व राष्ट्रीय पातळीवर त्यांनी ही यशस्वी कामगिरी केली आहे.

भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेच्या (नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया) वतीने गुजरात राज्य रायफल संघटनेतर्फे अहमदाबाद येथे १३ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ३० व्या अखिल भारतीय जी. व्ही. मावळणकर नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील पूर्व राष्ट्रीय स्तरावरील आयोजित १० मीटर एअर पिस्टल प्रकारात पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात कार्यरत नाईक रश्मी स्वप्नील धावडे यांनी कांस्य पदक जिंकले आहे. यामुळे नेमबाजीत उत्तमी कामगिरी करून रश्मी यांनी पुन्हा एकदा पोलीस दलाच्या अभिमानाचा भर घातली आहे.

मुंबई पोलिसांनी चुकीचं काम केल्याचे म्हणता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

गुजरातमध्ये आयोजित ३० व्या अखिल भारतीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्यानंतर नाईक रश्मी धावडे यांचे अभिनंदन करताना पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश.

पोलीस सेवेसह स्पर्धेसाठी सराव सुरू ठेवत आणि महाराष्ट्राबाहेर जाऊन कांस्य पदक जिंकणाऱ्या नाईक रश्मी यांचे पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अभिनंदन केले आहे व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. भोसरीत राहणाऱ्या असलेल्या रश्मी धावडे यांनी यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये भाग घेत एअर पिस्टल नेमबाजी प्रकारात यशस्वी कामगिरी करून पिंपरी चिंचवड पोलीस दलाचे नाव उंचावले आहे.

गुजरात येथे झालेल्या अजिंक्यपद स्पर्धेनंतर रश्मी पुढे कोणत्या स्पर्धेत खेळणार आहेत, हेही त्यांनी सांगितले आहे. “गुजरात येथील स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवरील अनेक खेळाडू होते. या स्पर्धेत पदकाला गवसणी घातल्यानंतर नक्कीच माझा आत्मविश्वास बळावला आहे आणि येणाऱ्या स्पर्धांमध्ये अजून चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल. आता दिवाळीनंतर, म्हणजेच या महिन्याच्या १८-१९ तारखेनंतर दिल्लीत मोठी स्पर्धा होणार आहे आणि त्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू सहभागी होतील. मीही या स्पर्धेत सहभागी होणार असून, त्यासाठी सराव सुरु आहे”, असे रश्मी म्हणाल्या. 

हेही वाचा ।नीरज’ने फुलवले भारताचे ‘सुवर्णकमळ’!

रश्मी धावडे २००९ पासून पिंपरी-चिंचवड पोलीस दलाकडून विविध स्पर्धांमध्ये नेमबाजी प्रकारात सहभाग घेत आल्या आहेत. अलीकडे, ऑगस्ट महिन्यात शहरातील अरुण पाडुळे शूटिंग क्लबकडून आयोजित नेमबाजी स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिंकले. २०१९ मध्ये अखिल भारतीय पोलीस नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी सांघिक कामगिरीत कांस्य पदक जिंकले आहे. २०१५ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील गन फॉर प्री नॅशनल नेमबाजी स्पर्धेत रश्मी यांनी रौप्य पदक जिंकले होते. रश्मी यांचे पती स्वप्नील धावडे हे भारतीय लष्करातून निवृत्त झाले असून, ते बॉक्सर आहेत. निवृत्तीनंतर स्वप्नील यांनी खेळाडूंना बॉक्सिंगचे प्रशिक्षण देणे सुरु केले आहे. 

 

सहभागी व्हा 👉 मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: