यंदाच्या अभियांत्रिकी सीईटीचे वेळापत्रक जाहीर!

ब्रेनवृत्त । मुंबई


2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेश देण्यासाठी येत्या १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) आयोजित केली जाणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत याविषयी पत्रकारांना माहिती दिली.

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) 15 सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत आयोजित होईल. तर २० ऑक्टोबरपर्यंत या परीक्षेचे निकाल जाहीर केले जातील आणि येत्या नोव्हेंबरपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरु होईल, असे सामंत यांनी सांगितले.

जेएनयूच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या सर्वकाही!

यंदा राज्यातील सुमारे ८ लाख ५५ हजार ८७९ विद्यार्थी सीईटी देणार आहेत. या प्रवेश परीक्षेसाठी राज्यभरात २२६ केंद्र निश्चित केली असून, राज्याबाहेरच्या केंद्रांमध्येही वाढ केल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रवेश परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आहे. या वेळापत्रकानुसार सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून प्रवेश नोंदणीला सुरुवात होईल आणि १५ ऑक्टोबरनंतर प्रवेश प्रक्रिया सुरु केली जाईल, अशी माहितीही सामंत यांनी आज दिली.

सहभागी व्हा 👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: