इंटेल व सीबीएसई राबवणार ‘सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता’ उप्रकम!

ब्रेनबिट्स । सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI for All)


जगप्रसिद्ध चिप निर्मात्या इंटेल (Intel) कंपनीने भारतातील सर्वसामान्य जनतेत कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी (Artificial Intelligence) मूलभूत समज निर्माण करण्यासाठी ‘सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI for All) हा उपक्रम जाहीर केला आहे. या उपक्रमासाठी देशाच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) सहकार्य लाभणार असल्याचे इटेलने म्हटले आहे.

इंटेलच्या ‘नागरिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI for Citizens) या कार्यक्रमाच्या धर्तीवर ‘सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI for All) उपक्रम राबवला जाणार आहे. हा एक ४ तासांचा स्वयंशिक्षण कार्यक्रम असून, यामार्फत अगदी सोप्या आणि सर्वसमावेश पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी (AI) माहिती शिकून घेता येणार आहे, असे इंटेलने प्रसारित केलेल्या संबंधित निवेदनात म्हटले आहे.

या उपक्रमांतर्गत पहिल्या वर्षी देशातील १० लाख (१ मिलियन) लोकांना एआयचे शिक्षण देण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.

इंटेलच्या आशिया प्रशांत व जपान क्षेत्रातील वैश्विक भागीदारी व उपक्रमांच्या संचालिका श्वेता खुराणा म्हणतात, “कृत्रिम बुद्धिमत्तेत जलद आर्थिक वृद्धी घडवून आणण्याची, वाढत्या लोकसंख्येशी संबंधित आव्हानांवर तोडगा काढण्याची तसेच लोकांच्या जीवितात व उदरनिर्वाहात मदत करण्याची अफाट शक्ती आहे. इंटेलच्या ‘एआय फॉर सिटिझन्स’ कार्यक्रमावर आधारित एआय फॉर ऑल  उपक्रमाच्या माध्यमातून लोकांमध्ये कृत्रिम  बुद्धिमत्तेविषयी जनजागृती व आवड निर्मण  केली जाईल. यामुळे भारत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या व्यापक वापरासाठी तयार असलेले राष्ट्र म्हणून उभे राहील.”

वाचा 👉 चीन तयार करतोय ‘कृत्रिम चंद्र’!

> ‘सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता’ची (AI for All) वैशिष्ट्ये 

  1. इंटेलच्या ‘नागरिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता’च्या  (AI for Citizens) धर्तीवर ‘सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI for All) उपक्रम राबवला जाणार आहे. 
  2. हे ४ तासांचे खुल्या स्वरूपातील (ओपन कन्टेन्ट रिसोर्स) कार्यक्रम असून, त्यामध्ये ११ भारतीय भाषांमधून ज्ञानार्जन करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.
  3. संपूर्ण कार्यक्रमाला एआय जागरूकता (दीड तास) व एआय रसास्वाद (अडीच तास) अशा दोन भागांमध्ये विभाजित करण्यात आले आहे.
  4. एआय जागरूकतेच्या अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेची सर्वसामान्य माहिती, कृत्रिम बुद्धिमत्तेविषयीचे गैरसमज आणि एआयची क्षमता या घटकांचा समावेश आहे.
  5. कृत्रिम रसास्वाद अंतर्गत शिकणाऱ्याला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मुख्य पैलूंशी  व उद्योगांवरील त्याच्या परिणामांशी अवगत केले जाणार आहे. सोबतच, शिकणाऱ्याला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर नवे उपक्रम सुरु करण्यास मार्गदर्शन केले जाणार आहे.
  6. उपक्रमाच्या प्रत्येक टप्प्याच्या शेवटी शिकणाऱ्याला वैयक्तिकृत डिजिटल बॅजेस देण्यात येतील, जे त्यांना विविध समाजमाध्यमांवर सामायिक  करता येतील.

नक्की वाचा । फ्रान्सने गुगलवर ठोठावला ५०० दशलक्ष युरोंचा दंड!

इंटेल व सीबीएसईच्या या संयुक्त उपक्रमाविषयी बोलताना सीबीएईचे कौशल्य शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे संचालक बिश्वजीत साहा  म्हणाले, “एआय फॉर ऑल हे  जगातील सर्वांत मोठे कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक जनजागृती कार्यक्रम आहे. यामुळे एआयसंबंधी सर्वसमावेश व सोप्या पद्धतीने ज्ञानप्रसार करून भारताला वैश्विक पातळीवर तंत्रज्ञान क्षेत्रात वेगळी ओळख मिळण्यास मदत होईल.”

 

सहभागी व्हा 👉 मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: