भारताच्या ट्विटर प्रमुखाला कर्नाटक न्यायालयाचा तूर्त दिलासा

ब्रेनवृत्त । बंगळुरू 


ट्विटरवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओच्या संदर्भात उत्तरप्रदेश पोलिसांनी ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, कर्नाटक उच्च न्यायालयाने माहेश्वरी यांना या प्रकरणी तूर्तास दिलासा दिला आहे.  

कर्नाटक उच्च न्यायालयाने गाझियाबाद पोलिसांना आदेश दिले आहेत, की सद्या त्यांनी ट्विटर इंडियाच्या प्रमुखाबद्दल कोणतीही कठोर कारवाई करून नये आणि त्यांच्या चौकशी करायची असल्यास, ती आभासी पद्धतीने करावी. माहेश्वरीच्या वकिलांनी  न्यायालयाला सांगितले, की ते ट्विटरचे फक्त एक कर्मचारी आहे आणि संबंधित गुन्ह्याशी त्यांचा काहीही संबंध नाही. 

छायाचित्र स्त्रोत : लाईव्ह लॉ

वकिलांनी न्यायालयाला सांगितले, की त्यांचा पक्षकार बंगळुरूमध्ये राहतो. सोबतच, दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून त्यांचे निवेदन नोंदवले जावे, असे सर्वोच आणि उच्च न्यायालयाचेही म्हणणे आहे. मात्र गाझियाबाद पोलिसांना माहेश्वरी प्रत्यक्ष हवे आहेत. 

ब्रेनसाहित्य ।  समाजमाध्यमांचे ‘आभासी’ जग

काय आहे प्रकरण ? 

काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एक चित्रफीत अतिशय वेगाने पसरली (व्हायरल) होती. एका मुस्लिम माणसाला मारहाण करण्यात येत आहे आणि त्याला बळजबरीने ‘जय श्रीराम’ म्हणायला लावले जात असल्याचे त्या चित्रफितीत चित्रित आहे. दरम्यान, त्या व्हिडिओला प्रसारित करण्याच्या व सांप्रदायिक रंग  देण्याच्या कारणावरून ट्विटर, वायर डॉट इन, काँग्रेस नेते व पत्रकारांविरुद्धगुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

याच प्रकरणी गाझियाबाद पोलिसांनी माहेश्वरी यांना पोलीस स्थानकात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेशपत्र (समन) जाहीर केले. याप्रकरणी भारताच्या ट्विटर अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी दूरदृश्यसंवादाच्या माध्यमातून उपलब्ध असल्याचे कळवले होते. मात्र पोलिसांनी ट्विटर अधिकाऱ्यांचे हे निवेदन नाकारले आहे.

 


अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी भेट द्या www.marathibrain.in ला.

फॉलो करा आम्हाला ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, टेलिग्राम इत्यादींवर.

तुमचे लिखाण, प्रतिक्रिया व सूचना writeto@marathibrain.in वर नक्की पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: