अतिगंभीर ‘कोव्हिड-१९’ रुग्णांवर ‘एसएनजी ००१’ प्रभावी ! 

यूकेतील औषधनिर्माण कंपनी ‘सिनैर्गेन’ने तिच्याद्वारे निर्मित औषधीच्या मदतीने ‘कोव्हिड-१९’ रूग्णांवर उपचार करण्यात यश मिळाल्याचा दावा केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कोरोना रूग्ण गंभीरपणे आजारी पडण्याचा धोका त्यांच्या औषधाच्या वापरामुळे 79 टक्क्यांनी कमी झाला आहे. याच ‘जीवनरक्षक औषधा’बद्दल  आज आपण जाणून घेणार आहोत.

ब्रेनविश्लेषणअनुराधा धावडे

कोरोना विषाणूवरील लस बनवण्यासाठी जगभरातील संशोधक सर्व स्तरावर प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे तात्पुरते का होईना, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांमध्ये डेक्सामाथासोन, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि रेमेडीसिव्हिर यांसारख्या औषधी प्रभावी ठरत आहेत. अनेक देशांमध्ये या औषधांच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे. अशातच पुन्हा एक औषध कोरोनाबाधित रुग्णांसाठी फायदेशीर ठरत असल्याचे समोर आले आहे.

यूकेतील औषधनिर्माण कंपनी ‘सिनैर्गेन’ने (Synairgen) या औषधीच्या मदतीने ‘कोव्हिड-१९‘ रूग्णांवर उपचार करण्यात यश मिळाल्याचा दावा केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कोरोना रूग्ण गंभीरपणे आजारी पडण्याचा धोका त्यांच्या औषधाच्या वापरामुळे 79 टक्क्यांनी कमी झाला आहे.

हे औषध कोणते आहे ?

या औषधचे नाव ‘एसएनजी 001’ (SNG001) असे आहे. हे ‘इंटरफेरॉन बीटा प्रोटीन’वर आधारित औषध आहे. विषाणूजन्य संसर्ग झाल्यास शरीर हे प्रोटीन तयार करते. या औषधाच्या वापरामुळे कोरोना रूग्णांना फायदा होत असल्याचा दावा युके औषध कंपनी सिनैर्गेनने केला आहे.

ब्रेनबिट्स | कोव्हिड-१९’वर प्रभावी ठरणारे’;डेक्सामेथासोन’ म्हणजे नक्की काय ?

हे औषध कसे काम करते ?

या औषधामध्ये संसर्गविरोधी (अँटीवायरल) प्रथिन आहे, जे श्वासोच्छवासाच्या (इनहेल) स्वरूपात घेतले जाते. यातून तयार होणारी वाफ फुफ्फुसांपर्यंत पोहोचते. याचा उपयोग केल्याने केवळ कोरोना रूग्ण गंभीर आजारी पडण्याचा धोका कमी झाला नाही, तर ज्या रुग्णांना हे औषध देण्यात आले होते ते देखील लवकर बरे झाले आहेत. म्हणजेच जे रुग्ण बरे होण्यासाठी 9 दिवस लागत होते, ते ६ दिवसात बरे होत आहेत.

वाचा : भारतीय बनावटीच्या दुसऱ्या लसीची मानवी चाचणी सुरू

श्वासोच्छवासाच्या समस्यांमध्ये आराम

कंपनीने असाही  दावा  केला आहे की,  या औषधाच्या वापरामुळे कोरोनोच्या रूग्णांना श्वास घेण्यात कमी त्रास जाणवत आहे. तसेच रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांना अतिदक्षता विभागाची (आयसीयू) गरजही कमी भासू लागली आहे.

101 रूग्णांवर केला अभ्यास

सिनैर्गेन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड मार्सडेन म्हणाले, “30 मार्च ते 27 मे दरम्यान यूकेमधील 9 वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल झालेल्या 101 कोरोना रूग्णांना हे औषध देण्यात आले. त्यात अशा स्वरूपाचे सकारात्मक परिणाम दिसून आले. आम्हाला यापेक्षा चांगल्या निकालाची अपेक्षा नव्हती. इस्पितळात दाखल झालेल्या कोरोना रूग्णांच्या उपचाराचा हा मोठा विजय आहे.”

‘कोव्हिड-१९’वर भारतीय बनावटीची लस तयार !

त्याचप्रमाणे, ‘एसएनजी 001’ या औषधाने कोरोना रूग्णांवर उपचार मंजूर करण्यासाठी आणखी कोणती माहिती हवी आहे, त्यासाठी  कंपनी येत्या काही दिवसांत जगातील वैद्यकीय नियामकांना आपले निष्कर्ष सादर करेल. तसेच “आम्ही शासन आणि इतर महत्त्वपूर्ण गटांसह एकत्र काम करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरुन कोरोना विषाणूचे औषध लवकरात लवकर तयार करता येईल”, असेही रिचर्ड मार्सडेन यावेळी म्हणाले.

Join @marathibraincom

आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या प्रतिक्रिया चौकटीत नक्की नोंदवा !

अशाच माहितीपर व विश्लेषणात्मक बातम्यांसाठी थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून राहा www.marathibrain.com सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा writeto@marathibrain.com वर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: