आता तुमच्या ट्विटवरील संभाषणातही दिसणार जाहिराती

 

मराठीब्रेन ऑनलाईन

ब्रेनवृत्त । सॅन फ्रॅन्सिस्को 


२०२१ च्या सुरुवातीलाच जाहीर केल्याप्रमाणे ट्विटर मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जॅक डॉर्सी यांनी ट्विटरच्या मौद्रिकीकरणाविषयी अजून एक पाऊल उचलले आहे. मौद्रिकीकरणाचे ध्येय साध्य करण्यासाठी आता ट्विटरवरील संभाषणांमध्ये व ट्विटखालील प्रतिक्रियांमध्येही जाहिराती दिसणार आहेत आणि यासाठी ट्विटरने चाचणीही सुरू केली आहे.   

मौद्रिकीकरणाचे ध्येय अंमलात आणण्यासाठी ट्विटर सद्या जोमाने कार्यरत आहे. याबाबत सीईओ जॅक डॉर्सी यांनी आता अजून एक नवे पाऊल उचलले असून, याअंतर्गत आता ट्विटरवरील संभाषणामध्ये जाहिराती दाखवल्या जातील. यासाठी चाचणी सुरु करण्यात आली असून, प्रत्येक मूळ ट्विटच्या खाली असलेल्या पहिल्या, तिसऱ्या किंवा आठव्या प्रतिक्रियेनंतर वापरकर्त्यांना जाहिराती दिसतील. 

“आजपासून आम्ही काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ट्विट संभाषणांमध्ये नवीन जाहिराती दाखवण्याची चाचणी करत आहोत,” ट्विटरच्या महसूल उत्पादनाचे प्रमुख ब्रूस फाल्क यांनी बुधवारी सांगितले. पुढे ब्रूस म्हणाले, “जर तुम्ही या चाचणीचा भाग असाल (जे फक्त iOS आणि Android वर जागतिक आहे), तर तुम्हाला एखाद्या मूळ ट्विटखालील पहिल्या, तिसऱ्या किंवा आठव्या प्रतिक्रियेनंतर जाहिराती दिसतील.”

नक्की वाचा । ट्विटर इंडियाच्या भारतीय तक्रार अधिकाऱ्याची पायउतारणी !

ट्विटरवरील संभाषणांमध्ये जाहिराती दाखवून ट्विटर “जाहिरात निर्माते आणि जाहिरातदारांसाठी आर्थिक संधी आणि प्रोत्साहन” देण्याच्या प्रयत्नात आहे. “येत्या काही महिन्यांत आम्ही या स्वरूपाचा वापर करून, ते कसे कार्य करते आणि लोक व त्यांच्या संभाषणांवर याचा कसा परिणाम होतो हे समजून घेणयावर भर देणार आहोत,” असेही फाल्क पुढे म्हणाले.

“या चाचण्यांतून आम्हाला हाती लागलेल्या परिणामांचे आम्ही परीक्षण करू आणि ते कायमस्वरूपी करायचे का हे शोधून काढू. आम्ही आमच्या जाहिरातदारांसाठी हे करून पाहण्यास उत्सुक आहोत.सोबतच, आम्ही ट्विट करणाऱ्यांसाठी बक्षीस देण्यासह अतिरिक्त संधींबाबत दरवाजा कसा उघडू शकतो, हेही समजून घेण्यास उत्सुक आहोत”, असेही फाल्क यांनी नमूद केले.

हेही वाचा । फेसबुक, व्हाट्सऍप, इंस्टा सगळंच ठप्प!

ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सीच्या म्हणण्यानुसार, ट्विटरचे येत्या 2023 मध्ये किमान 315 दशलक्ष एमडीएयूसह (मौद्रिककरणयोग्य दैनिक सक्रिय वापरकर्ते) एकूण वार्षिक उत्पन्न दुप्पट म्हणजे 7.5 अब्ज डॉलर्स इतके करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.

“2023 मध्ये एकूण वार्षिक उत्पन्न दुप्पट म्हणजे 7.5 अब्ज डॉलर्स इतके करण्याचे आमचे ध्येय आहे. यासाठी आम्हाला कामगिरीच्या जाहिरातींसह बाजारपेठ मिळवणे, ब्रँड जाहिराती वाढवणे आणि जगभरातील छोट्या आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांमध्ये आमची उत्पादने वाढवणे आवश्यक आहे”, असे ट्विटरचे सीईओ यावर्षी फेब्रुवारीमध्येच म्हणाले होते. 

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: