अफगाणिस्तानहून मायदेशी परतलेल्या दोघांना कोरोनाची लागण!
ब्रेनवृत्त | नवी दिल्ली
निर्वासन अभियानाअंतर्गत अफगाणिस्तानहून मायदेशी परत आणण्यात आलेल्या १४६ भारतीय नागरिकांपैकी दोघांना कोव्हिड-१९ ची लागण झाली आहे. या दोघांना उपचारासाठी दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात (LNJP) दाखल करण्यात आले आहे.
युद्धजन्य परिस्थिती असलेल्या अफगाणिस्तानातून जीवितांंच्या बचावासाठी नाटो आणि अमेरिकी विमानांद्वारे काल अनेकांना बाहेर काढण्यात आले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी (सोमवारी) चार वेगवेगळ्या विमानांद्वारे १४६ भारतीय नागरिकांना कतारची राजधानी दोहामधून मायदेशी परत आणण्यात आले आहे.
अफगाणिस्तानवरील तालिबानी ताब्यात पाकिस्तानची मोठी भूमिका?
आतापर्यंत काबुलमधून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आलेल्या भारतीयांची ही दुसरी तुकडी आहे. याआधी रविवारी १३६ भारतीय नागरिकांना विशेष दोहावरून दिल्लीला परत आणण्यात आले.
दुसऱ्या तुकडीत मायदेशी परतलेल्या लोकांपैकी १०४ जणांना विस्टारा फ्लाईटद्वारे, ३० जणांना कतार एअरवेजद्वारे व ११ जणांना इंडगोद्वारे परत आणण्यात आले. तर १ व्यक्ती एअर इंडियाद्वारे भारतात परतली.
सहभागी व्हा👉मराठी ब्रेन
अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा मराठी ब्रेनसोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.
आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in