मानवी हक्क उल्लंघनात उत्तरप्रदेश सलग तीन वर्षे आघाडीवर!

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली


देशभरातील मानवी हक्क उल्लंघनाच्या प्रकरणांत उत्तरप्रदेश राज्य सलग तिसऱ्या वर्षीही आघाडीवर आहे. गेल्या तीन वर्षांत दरवर्षी नोंद झालेल्या एकूण मानवी हक्क उल्लंघनांपैकी ४०% प्रकरण हे एकट्या उत्तरप्रदेशमधील आहेत. राज्यसभेत विचारल्या गेलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना देशाच्या गृह मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाद्वारे (NHRC : National Human Rights Commission) देशभरात दरवर्षी होणाऱ्या मानवी हक्क उल्लंघनांची नोंद केली जाते. गृह मंत्रालयाने दिलेल्या मानवी हक्क आयोगाच्या आकडेवारीनुसार, मागील तीन आर्थिक वर्षांत उत्तरप्रदेशमध्ये सर्वाधिक मानवी हक्क उल्लंघनाच्या घटना घडल्या आहेत. या घटनांची तपासणी तसेच नोंद करण्याचे काम राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे आहे. 

युपीचे लोकसंख्या नियंत्रण विधेयक : दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना लाभांपासून मुकावे लागेल

डीएमके पक्षाचे खासदार एम. शनमुगण यांनी राज्यसभेत ‘देशातील मानवाधिकार उल्लंघनाच्या घटना वाढू लागल्या वाढू लागल्या आहेत का?’ असा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी म्हटले, की देशातील मानवी उल्लंघनाच्या घटनांची चौकशी करण्याचे आणि संबंधित माहितीची नोंद घेण्याचे कार्य एनएचआरसीचे आहे. राय यांनी आपल्या उत्तरात आयोगाच्या आकडेवारीचाही उल्लेख केला आहे. 

मंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत मानवी हक्क आयोगाने नोंद केलेल्या देशातील मानवी हक्कांची उल्लंघनाच्या घटनांची आकडेवारी कमी होत गेली आहे. सन २०१८-१९, २०१९-२० आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षांमध्ये अनुक्रमे ८९ हजार ५८४, ७६ हजार 628 आणि ७४ हजार ९६८ घटनांची नोंद करण्यात आली आहे. यंदा (२०२१-२२ आर्थिक वर्ष) ३१ ऑक्टोबरपर्यंत ६३ हजार १७० घटनांची नोंद झाली आहे.

हेही वाचा । मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानसह अनेकांचे चीनला समर्थन!

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या (एनएचआरसी) आकडेवारीनुसार देशातील सर्वाधिक मानवी हक्क घटना उत्तरप्रदेशमध्ये घडल्या आहेत. एकूण प्रकरणांपैकी उत्तरप्रदेशमध्ये २०१८-१९ मध्ये ४१,९४७, २०१९-२० मध्ये ३२ हजार ६६३ व ३० हजार १६४ घटना २०२०-२१ मध्ये घडल्या आहेत. तर यंदा ३१ ऑक्टोबरपर्यंत ४,९७२ घटनांची नोंद झाली आहे. 

 

सहभागी व्हा👉मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: