जेएनयू दंगलीप्रकरणी कुणालाही अटक नाही : गृह मंत्रालयाची माहिती

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली


दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) आवारात सन २०२०मध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने संसदेला दिली आहे. मुखवटे घातलेल्या काही गुंडांनी विद्यापीठात दंगल घडवली होती आणि कित्येक विद्यार्थ्यांना जखमी केले होते.

छायाचित्र स्रोत : पीटीआय

वाचा | जेएनयूच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या सर्वकाही!

संबंधित मुद्यावर विचारण्यात आलेल्या एका तारांकित प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले, की जानेवारी २०२०मध्ये जेएनयूमध्ये घडलेल्या दंगली संदर्भात दिल्ली पोलिसांनी तीन गुन्ह्यांची नोंद केली आहे. मात्र, दीड वर्ष ओलांडून गेल्यानंतरही अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

संघीय मंत्रालयाने संसदेत सांगितले, की संबंधित घटनेच्या तपासणीत साक्षीदारांचे परीक्षण, पुराव्यांचे (फुटेजसह) संकलन आणि विश्लेषण तसेच सापडलेल्या संशयितांचे परीक्षण इत्यादी बाबींचा समावेश होता. तरीपण, कुणालाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

हेही वाचा | ऑक्सिपार्क प्रकल्पावरून पुणे विद्यापीठाला उच्चशिक्षण मंत्र्यांची फटकार!

५ जानेवारी २०२० रोजी जवळपास ५० मुखवटे घातलेल्या पुरुष व महिला गुंडांनी काठ्या व हातोडे घेऊन दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात दंगल घडवली होती. या दंगलीत त्यांनी पोलीस घटनास्थळी पोहचण्याच्या आधीच अनेक विद्यार्थ्यांवर हल्ले केले तसेच वसतिगृहे व इतर इमारतींची तोडफोड केली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची विद्यार्थी प्रतिनिधीही या दंगलीत जखमी झाली होती. तिच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याची छायाचित्रे जेव्हा सगळीकडे पसरली, तेव्हा या घटनेचे पडसाद देशभरात पडले होते.

दंगलीच्या काही वेळानंतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी या हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने व मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला. दंगलीच्या विरोधातील ही निदर्शने पुणे, मुंबई, कोलकाता, हैद्राबाद, ओडिशा, चेन्नई यांसारख्या देशभरातील मोठमोठ्या शहरांतही पसरली होती. 

 

Join @ मराठी ब्रेन


अशीच विविधांगी माहिती, लेख, साहित्य, बातम्या, विश्लेषण इ. थेट मराठीत जाणून घेण्यासाठी जुळून रहा www.marathibrain.in सोबत ट्विटर, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम आणि इमेलवरून.

आम्हाला लिहा : writeto@marathibrain.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: